Thursday, November 8, 2012




शिवरायांच्या आणि राजर्षी शाहु महाराजांच्या पद स्पर्शाने पुनित झालेल्या भुमीवर पन्हाळा गडाची तुतारी डौलाने दुमदुमणारी निर्सगाच्या सानिध्यात विरपराक्रमाची पताका वारणा खॊर्‍यात अद्यावत फडकत आहे. दख्खनच्या पायथ्याशी जन्म झाला हेच भाग्य आहे. या पवित्र भुमिला नव्या आचारविचाराची - संस्कृतीची परंपरा आहे. जुन्या नव्या काळाची सांगड घालुन २१ व्या शतकातील दश दिशाची व विचाराची एक सुंदर मालिका तीला साचेबंद चौकाटी बसवुन मुक्त हस्ते विचारांचे मोती द्यावे असे अगदी मनापासुन वाटत होते. केवळ कल्पनेच्या जगात वावरत असताना समाजाला ज्ञानप्रबोधन व समाजप्रबोधन कोण्त्या स्वरुपात करता येईल या विचारात परीपव्कता व मूर्त स्वरुप क से देता येईल यांचा विचार मनात चालु असताना विचारांच्या मथंनातून निघालेले ज्ञानाअमृत म्हणजे २४ डिसेंबर २००१ रोजी जन्म घेतलेले वारणेचा वाघ वृत्तपत्र.
एक वर्षाच्या कालखंडाने काम करत असताना अनेक गोडकडू अनुभव आले. पहिला वर्धापन दिन साजरा करत असताना साहित्य संमेलनांने करावी असे संपादक मंडळाने एकमताने ठरवुन अनुमती दिली. व २४ डिसेंबर २००२ रोजी कोडोली नगरीत पहिले साहित्य संमेलन पार पडले. मिळालेला प्रतिसाद कमी असला तरी सुरुवात योग्य आहे असे पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. प्राचार्य मुकुंद दातार यांनी कानमंत्र दिला. चार पदरी महामार्ग व्होण्यास एक पाऊल वाटेची गरज असते. ती पाऊलवाट वारणेचा वाघ च्या रुपाने तयार झाली आहे. संपुर्ण संपादक मंडळास हा मंत्र नवऊबारी आणणारा ठरला. आणि शेवट पर्यंत प्रेरणा देत राहील यात शंका नाही. नंतरच्या काळात वारणेचा वाघ फौंडेशन या सेवाभावी संस्थेचा जन्म झाला व वारणेचा वाघ कार्यास जोमाने हातभार मिळाला.
शिवप्रभू , साधुसंत व मराठमोळ्या माणसाच्या पाद धुळीने मळलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी. चैतन्य भूमी... आज जागतिक इतिहास वाचला तर बदलत्या मनोवृत्तीनुसार पुर्वेकडील राष्ट्रांत अनेक शस्त्र व अस्त्राचा जन्म झाला आहे, की जे संख्येत मोजता येतील इतकी मानवी व वित्तहानी करु शकतात पण अध्यात्माच्या प्राबल्यावर सुविचाराच्या कुंचल्यातून लेखनी ब्रम्हा अस्त्र निर्मान करण्याचे कार्य पश्चिमेकडील राष्ट्रातून म्हणजेच साधुसंताच्या भूमीतुन महाराष्ट्रातून घडले गेले आहे, घडत आहे. आजच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर सर्व जगात सुवर्ण दिशा देण्याचे कार्य याच मातीतून घडणार आहे हे सत्य आहे. याचाच भाग वारणेचा वाघ गेली नऊ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून खडतर अर्धकारणाच्या प्रवासात ठरलेल्या तत्वाशी जराही तडजोड नकरता आपले काम जोमाने करत आहे, काम करत असताना विविध अडचणी येतात पण असंख्य वाचकांच्या विश्वासाने संकटावर सहज विजय मिळवला जातो.